विलासराव देशमुखांची प्रकृती चिंताजनक

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांना चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून लिव्हरला सूज आली आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

Updated: Aug 7, 2012, 04:06 PM IST

www.24taas.com, चेन्नई

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांना चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून लिव्हरला सूज आली आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

विलासराव देशमुख सध्या ते डायलिलिस आणि व्हेंटिलेटरवर आहेत.  देशमुख  यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी तातडीने चेन्नईत हलविण्यात आले. त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेले काही महिने देशमुख यांची प्रकृती ठिक नसून, मध्यंतरी परदेशात जाऊन त्यांनी उपचार करून घेतले होते. दोन दिवसांपासून त्यांना ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने पुढील उपचाराकरिता खास हवाई रुग्णवाहिकेतून त्यांना चेन्नईला नेण्यात आले.

रविवारी सव्वाचारच्या सुमारास खासगी विमानाने विलासराव चेन्नईला रवाना झाले. त्यांच्यासोबत पुत्र आमदार अमित, अभिनेता रितेश, धीरज तसेच पत्नी वैशाली देशमुख असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.