येडियुरप्पा यांची पलटी, गौडाच मुख्यमंत्री

कर्नाटकाचील सत्तेची गादी सदानंद गौडाच संभाळतील असे आता स्पष्ट झाले आहे. कारण येडियुरप्पा यांनीच गौडाच मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आहे. येडियुरप्पा यांचे मन वळविण्यात भापचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यशस्वी झाले आहेत.

Updated: Feb 24, 2012, 12:56 PM IST

www.24taas.com, बंगळूर

 

 

कर्नाटकातील सत्तेची गादी सदानंद गौडाच संभाळतील असे आता स्पष्ट झाले आहे. कारण येडियुरप्पा यांनीच गौडाच मुख्यमंत्री असतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले  आहे. येडियुरप्पा यांचे मन वळविण्यात भापचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यशस्वी झाले आहेत, असेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

आज सकाळी चिंतन बैठकीपूर्वी नितीन गडकरी यांच्याशी येडियुरप्पा यांनी बोलणी केली. येडियुरप्पा यांच्या इशाऱ्यानंतर भाजपने कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. कर्नाटकातील नेतृत्वात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली. दरम्यान, येडियुरप्पा यांनी आपले दबाब तंत्र सुरूच ठेवल्याचेही सांगण्यात येत आहे. आमच्यात काही मतभेद नसल्याचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी दिल्लीत बोलताना सांगितले.

 

 

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांना पुन्हा सत्तेची स्वप्नं पडू लागलीयेत. पक्ष नेतृत्वानं २७  फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री पद द्यावे, अन्यता माझा मार्ग मोकळा आहे , असा इशारा त्यांनी दिला आहे.भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणून पुन्हा एकदा राज्याचं मुख्यमंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.

 

आखणी संबंधित बातमी

भाजपलाच इशारा, माझा मार्ग मोकळा – येडियुरप्पा