www.24taas.com, बंगळूर
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांना पुन्हा सत्तेची स्वप्नं पडू लागलीयेत. पक्ष नेतृत्वानं २७ फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री पद द्यावे, अन्यता माझा मार्ग मोकळा आहे ,असा इशारा त्यांनी दिला आहे.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणून पुन्हा एकदा राज्याचं मुख्यमंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. यासाठी आमदारांची बैठक बोलावून त्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं. कर्नाटकातील अवैध खाणींप्रकरणी नाव आल्यानं येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांनीच आपला उत्तराधिकारी म्हणून सदानंद गौडा यांचं नाव पुढे केलं होतं.
मात्र आता येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी पुन्हा जोर लावायला सुरूवात केलीय. आजपासून भाजपा आमदारांचं बेंगळूरूमध्ये चिंतन शिबीर सुरू होणारयं. भाजपाअध्यक्ष नितीन गडकरीही या शिबीराला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे येडियुरप्पांप्रकरणी त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणारय.