माहीची ८२ तासांनंतर सुखरूप सुटका

८२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षीय माहीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बुधवारपासून ७० फूट खोल कूपनलिकेत माही पडली होती. तिला बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

Updated: Jun 24, 2012, 02:44 PM IST

www.24taas.com, गुडगाव 

८२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षीय माहीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बुधवारपासून  ७० फूट खोल कूपनलिकेत  माही पडली होती. तिला बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी रात्री येथील खडकाळ जमीन फोडण्यात बचावपथकाला यश आले. त्यामुळे सदर कुपनलिकेला समांतर बोगदा खोदून माहीला आज रविवारी सकाळी बाहेर काढण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बुधवारी माहीचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मित्र- मैत्रिणींबरोबर खेळत असताना ती कूपनलिकेत पडली. तेव्हापासून तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तिला नलिकेच्या साह्याने प्राणवायू पुरविला जात होता.सुरक्षा दलाचे सुमारे शंभर जवान तिला बाहेर काढण्यासाठी दिवसरात्र झटत होते. गुडगाव मेट्रो रेल्वे, आरोग्य, महसूल विभाग आणि काही स्थानिक नागरिकही घटनास्थळी उपस्थित होते.