पवारांची नवी खेळी, राजीनामा दिलाच नाही

केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. गेले दोन दिवस पवार नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. मात्र शरद पवार हे राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती.

Updated: Jul 20, 2012, 12:52 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. गेले दोन दिवस पवार नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. मात्र शरद पवार हे राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती. शरद पवार हे काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नक्कीच नाराज आहेत.

 

मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांच्याविषयी अपप्रचार केला जात आहे. आणि हिच गोष्ट जास्त दु:खदायक आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून शरद पवारांनाविरूद्ध वादामध्ये भर घालीत आहेत. असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

 

पवारांनी नाराजीचे मुद्दे पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवले असून त्याबाबत पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांनी पवारांशी चर्चा केली असल्याची माहितीही पटेल यांनी दिली आहे. शरद पवारांच्या घरी झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपल्यानंतर ही माहीती देण्यात आली.

 

'पवारांच्या नाराजीवर लवकरच तोडगा काढणार' असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट केले आहे. राजीनामा नाट्यावर काँग्रेसने स्पष्ट केले की, 'पवारांच्या नाराजीवर लवकरच तोडगा काढणार' केंद्रीय मंत्रिमंडळात नंबर दोनच्या पदावरुन शरद पवार नाराज असल्याच्या सांगितले जात होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की, ज्येष्ठतेवरून पवार नाराज नाहीत.