देशभरातील वकील संपावर

देशभरात आज वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. परदेशातील कायदा विद्यापीठांना भारतात प्रवेश देणा-या उच्च शिक्षण व संशोधन विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील वकिलांनी आज आणि उद्या काम बंद आंदोलन पुकारलंय.

Updated: Jul 11, 2012, 06:16 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

देशभरात आज वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. परदेशातील कायदा विद्यापीठांना भारतात प्रवेश  देणा-या उच्च शिक्षण व संशोधन विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील वकिलांनी आज आणि उद्या काम बंद आंदोलन पुकारलंय.

उच्च शिक्षण आणि संशोधक विधेयक कायद्यामुळे विद्यापीठांना भारतात प्रवेश दिल्यास बार काउंसिलच्या अधिकारांवर गदा येईल असं बार काउंसील ऑफ इंडियाचं म्हणणं आहे. राज्यात एकूण 1 लाख 25 हजार वकिलांनी बंद पुकारला आहे.

पुणे आणि नाशाकातल्या वकील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामील झालेत. वकील कोर्टात जात नसल्यामुळे कोर्टातल्या महत्वाच्या केसेसवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.