www.24taas.com, छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये भाजप सरकारची पोलखोल झालीय. भाजप खासदार अजय संचेती यांच्यावर कृपादृष्टी दाखवल्यामुळे छत्तीसगड सरकारचं १ हजार ५२ कोटींचं नुकसान झालं आहे.
'एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी' या संचेती यांच्याच कंपनीला कोळशाच्या खाणी बहाल केल्या गेल्या आहेत. हे करताना छत्तीसगड खनिज विकास महामंडळाच्या नियमांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचं म्हटलं आहे.एकीकडे कॅगच्या अहवालावरुन भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारला कात्रीत पकडत आहेत, तर छत्तीसगडमध्ये भाजप खासदाराचा घोटाळा समोर येत आहे.
'कॅग'च्या ताशेऱ्यांनी भाजपची ही पोलखोल झालीय. कोळसा खाणींचा लिलाव करताना संचेतींना झुकतं माप देण्यात आल्याचं कॅगच्या अहवालात नमूद आहे. तर लिलाव पारदर्शक पद्धतीनेच झाला असा खुलासा संचेती यांनी केलाय.
[jwplayer mediaid="81122"]