केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला

केंद्र सरकारी आणि विविध नवरत्न कंपन्यांतील कर्मचा-यांनी उद्या देशव्यापी संप पुकारलाय. या संपात देशातल्या राष्ट्रीयकृत बँकाही सहभागी होणार आहेत. देशातल्या अकरा मोठ्या आणि पाच हजार छोट्या कामगार संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

Updated: Feb 27, 2012, 10:51 PM IST

www.24taas.com,

केंद्र सरकारी आणि विविध नवरत्न कंपन्यांतील कर्मचा-यांनी उद्या देशव्यापी संप पुकारलाय. या संपात देशातल्या राष्ट्रीयकृत बँकाही सहभागी होणार आहेत. देशातल्या अकरा मोठ्या आणि पाच हजार छोट्या कामगार संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

बँक कर्मचा-यांच्या संपामुळं बँकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. या संपाला महापालिका कर्मचारी आणि मंत्रालयातल्या संघटनांनी पाठिंबा दिलाय. मात्र हे कर्मचारी संपात सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात आलंय. तसंच टॅक्सी, रिक्षा युनियनचाही या संपाला पाठिंबा आहे, पण टॅक्सी, रिक्षा सुरूच राहणार आहेत. त्यामुळे वाहतुकीवर या संपाचा परिणाम जाणवणार नाही....

बेरोजगारी,सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचं खासगीकरण करु नये, रोजगार निर्मितीत चालना आणि किमान वेतन कायद्या सुधारणा अशा वेगवेगळ्या मागण्या संपकरी कर्मचा-यांनी मांडल्यात.