काश्मीरमध्ये 'तुफान' तडाखा

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आलेल्या वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाचा एक बळी गेला असून दोघे जण बेपत्ता आहेत. तसेच हिमकडा कोसल्याने पाच जण फसल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. खोऱ्यात वादळ कायम असल्याने शाळांना सुटी जाहीर कऱण्यात आली आहे.

Updated: Mar 20, 2012, 03:58 PM IST

www.24taas.com, श्रीनगर

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आलेल्या वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाचा एक बळी गेला असून दोघे जण बेपत्ता आहेत. तसेच हिमकडा कोसल्याने पाच जण फसल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. खोऱ्यात वादळ कायम असल्याने शाळांना सुटी जाहीर कऱण्यात आली आहे.

वादळाने मोठ्याप्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवरची वाहतूक खोळंबली आहे.  हिमकडा कोसळण्याच्या घटनांमध्ये घट होऊन काही दिवस  उलटत नाहीत तोच जम्मू आणि काश्‍मीरला वादळाने तडाखा दिला आहे. पोलिसांनी प्रसिद्ध दाल सरोवरातील हाऊसबोटमध्ये राहणाऱ्या अनेक पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. वादळामुळे ट्रेकिंगला न जाण्याची सूचना पर्यटकांना देण्यात आली आहे. पहलगाम येथे पर्यटकांच्या झोपडीवर झाड पडल्याचे वृत्त आहे. या घटनेत जीवित झाली नसल्याचे समजते. वादळाचा जोर अद्यापही कायम आहे.

काश्मीरमध्ये आपातकालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात तातडीने अधिकारी वर्गाची बैठक बोलविण्यात आली आहे. आपातकालीन परिस्थिवर च्रर्चा करण्यात आली. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे. सरकारी अधिकारी आणि लष्कर परिस्थिवर लक्ष ठेवून आहे.