www.24taas.com, उत्तराखंड
उत्तरराखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये यांच्यामध्ये घमासान सुरू होतं. अखेर या लढतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. उत्तराखंड क्रांती दलामधील एक आणि तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस आता सत्ता स्थापन करेल.
राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनीही काँग्रेसला सहमती दर्शवली आहे. ७० सदस्यांच्या सभागृहात या चार जणांमुळे ३६ हा मॅजिक फिगर गाठण्यात काँग्रेस अखेर यशस्वी झाले आहे.
काँग्रेसला चार आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.काँग्रेस आता नवीन नेत्याची नियुक्ती करेल.