www.24taas.com, नवी दिल्ली
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. उद्योग मंत्री नारायण राणे यांनीही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि ए.के. अँथनी यांची भेट घेतली. मुंबईत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळतल्या फेरबदलांची चर्चा सुरु झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर ही भेच महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यावर आता मंत्रिमंडळातल्या फेरबदलांच्या हालचालींची चर्चा सुरु झाली आहे. त्या दृष्टीनं दिल्लीत हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळतल्या फेरबदलांची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे कोणावर गंडांतर येणार याची चर्चा झडत आहे. त्यामुळे राणे आणि चव्हाण यांच्या भेटीची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान मार्च महिन्यांत होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतल्या नावांचीही चर्चा मुख्यमंत्र्यांनी केल्याचं वृत्त आहे. मात्र, दोन महत्त्वाचे दोन नेते दिल्लीत सोनिया गांधींना भेटायला गेल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. ही पूर्वनियोजित नव्हती. या भेटीसंदर्भात गुप्तता पाळण्यात आली होती. १५ मार्चपासून अर्थसंकल्प आधिवेशन सुरू होणार आहे. हे आधिवेशन साधारण १ ते दीड महिना चालणार आहे. त्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळतल्या फेरबदलांची चर्चा सुरु झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर ही भेच महत्त्वाची मानली जात आहे.
व्हीडिओ पाहा....
[jwplayer mediaid="63016"]