झी २४ तास वेब टीम, श्रीनगर
संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याची फाशी रद्दव्हावी , यासाठी जम्मू - काश्मीरविधानसभेत मांडण्यात आलेला ठराव बुधवारी कॉंग्रेस आणि भाजप सदस्यांच्या गोंधळात रद्द झाला . भिन्न मुद्द्यांप्रकरणीएकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करणाऱ्या या दोन्ही पक्षांच्यासदस्यांनी सभागृहातील पंखे ,टेबले उलथवून लावत केलेल्या गदारोळामुळे विधानसभे चेकामकाज पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले .
अफझल गुरूला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करावी , यासाठी अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी विधानसभेत खासगी ठराव मांडला होता . त्यावरबुधवारी चर्चा होणे अपेक्षित होते . मात्र काँगे्रस आणि भाजपच्या गोंधळात सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याने आता हा ठराव चालू अधिवेशनापुरते रद्दबातल झाला आहे .
विधानसभेत बुधवारी चर्चा सुरू होताच , भाजप आणि पँथर्स पार्टीच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली . तर विधानपरिषदेच्या गत निवडणुकीतील प्रतिमतदानाप्रकरणी निलंबित भाजप सदस्यांना बडतर्फ करण्याची मागणी करत काँगे्रसच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली . यातून निर्माण झालेल्यागोंधळात विधानसभाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले .