वीणा मलिक आणि कास्टिंग काऊच…

नेहमीच वादविवादांच्या फेऱ्यात अडकणारी (स्वत:ला अडकवून घेणारी) पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: May 14, 2012, 12:39 PM IST

www.24taas.com, मुंबई

नेहमीच वादविवादांच्या फेऱ्यात अडकणारी (स्वत:ला अडकवून घेणारी) पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच एका पार्टीत एका तरुणाबरोबर गुफ्तगु करताना ती दिसली. हा तरुण दुसरा तिसरा कुणी नसून तिच्या आगामी चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत मधुकर होता, ही गोष्ट नंतर उघड झालीच. त्यानंतर, बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यासाठी वीणा मलिक स्वत:च ‘कास्टिंग काऊट’चा उपयोग तर करत नाही ना? अशी चर्चा आता चित्रपटसृष्टीत सुरू झालीय.

 

अर्थातच, वीणानं या सगळ्या गोष्टी थोतांड असल्याचं म्हटलंय. ‘हेमंतबरोबर फिरणं आणि जेवणं म्हणजे मी त्याच्याबरोबर डेटींग करतंय असं नाही. या सगळ्या निरर्थक चर्चा आहेत. हेमंतबरोबर माझं चांगले प्रोफेशनल संबंध आहेत. आणि मी त्याच्या पत्नीलाही चांगलंच ओळखते. त्यामुळे हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत’ असंही ती स्पष्ट करते.

 

सध्या बऱ्याचदा अश्मित पटेलबरोबर दिसणारी वीणा मलिक हेमंत मधुकरच्या एका हॉरर थ्रीडी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. काहींच्या मते, आपल्या आगामी चित्रपटासाठी वीणाचा हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. यावर वीणा संतापून म्हणते, ‘मी फक्त हेमंतबरोबर दिसतेय आणि कुणी वेगवेगळ्या पद्धतीने फोटो काढून त्याला वेगळा अर्थ दिला, तर त्यात माझी काय चूक आहे? चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मी असं काहीही करणार नाही.’