लिओनार्दो दिकॅप्रिओला वेध 'बॉलिवूड'चे!

लिओनार्दो दिकॅप्रिओ...हॉलिवूडचाच नाही तर जगभरातल्या तरूण-तरुणींचा हार्टथ्रोब! ‘टायटॅनिक’ सिनेमा हिट झाला आणि लिओनार्दो दिकॅप्रिओ हे नाव प्रत्येकाच्या परीचयाचं झालं. कोणालाही भुरळ घालेल असा गोडवा लिओनार्दोच्या चेहऱ्यामध्ये आहे.

Updated: Jan 13, 2012, 09:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

लिओनार्दो दिकॅप्रिओ...हॉलिवूडचाच नाही तर जगभरातल्या तरूण-तरुणींचा हार्टथ्रोब! ‘टायटॅनिक’ सिनेमा हिट झाला आणि लिओनार्दो दिकॅप्रिओ हे नाव प्रत्येकाच्या परीचयाचं झालं. कोणालाही भुरळ घालेल असा गोडवा लिओनार्दोच्या चेहऱ्यामध्ये आहे.

 

टायटॅनिक सिनेमातून लिओनार्दोला केट विंसलेटसह काम करण्याची संधी मिळाली. खरंतर या सिनेमाच्यावेळी केट एक सुप्रसिध्द अभिनेत्री होती तर लिओनार्दो नवखा हिरो. मात्र टायटॅनिकच्या रिलीजनंतर लिओनार्दोचं नशिबच बदललं. हा सिनेमा रिलीज झाला आणि लिओनार्दो रातोरात स्टार झाला. या सिनेमामध्ये त्याने केटला  दिलेली साथ ‘अमेझिंग’ होती. या दोघांमधला रंगलेला रोमान्स सिल्व्हर स्क्रीनवर पाहणं म्हणजं सुखद अनुभवच...

 

टायटॅनिक बोटीच्या टोकावर रंगलेला त्यांचा हा रोमॅण्टिक अंदाज सगळ्यांनाच आवडला. प्रियकरावर विश्वास ठेवत, घट्ट मिटलेल्या डोळ्यांनी बोटीच्या टोकावर उभं राहून प्रेमाच्या महासागराची अनुभूती लिओनार्दोने केवळ केटलाच या सीनमधून दिली नाही तर थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनाही दिली.

[jwplayer mediaid="28887"]

तसंच या सिनेमातील ‘माय हार्ट विल गो ऑन…’ या गाण्यानेही प्रेक्षकांना आपलंस केलं. लिओनार्दोची ही क्रेझ इथेच थांबत नाही, तर आत्तापर्यंत लिओनार्दोला ऑस्कर पुरस्कारासाठी तीनदा नॉमिनेशन मिळालं आहे. जगभरातील प्रेक्षकांवर गारुड करणारा हा हॉलिवूडचा चॉकलेट हिरोसोबत सध्या ‘बिग बी’ अमिताभ बच्चन हे देखील काम करत आहेत. एका हॉलिवूडपटातून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. मात्र लिओनार्दोचं हे हॉलिवूड-बॉलिवूड कनेक्शन इथेच थांबत नाही, तर आता लिओनार्दोला बॉलिवूडचे वेध लागले आहेत. भारतीय सिनेमांचं मला नेहमीच ‘फॅसिनेशन’ वाटत राहिलंय. जर मला हिंदी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्की त्यात काम करेन, असं लिओनार्दोने स्पष्ट केलं आहे. एकूणच हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेमांचा इतिहास पाहता हॉलिवूडने नेहमीच बॉलिवूडची खिल्ली उडवली आहे. मात्र, हे चित्र आता हळुहळू बदलत आहे असंच वाटतंय. कारण एक-एक करुन आता हॉलिवूड स्टार्सही बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी उत्सुक दिसत आहेत आणि भारतीय सिनेमांसाठी ही पर्वणीच आहे.