महेश भट्ट, घई 'कास्टिंग काऊच' करणं थांबवा!

सुहेल सेठने आता महेश भट्ट आणि सुभाष घई यांच्यासारख्या प्रसिद्ध फिल्म मेकर्सवर हल्लाबोल केला आहे. सुहेल सेठ म्हणाले, “सगळ्या महेश भट्ट आणि सुभाष घईंना माझी सूचना आहे की त्यांनी आता कास्टिंग काऊच करणं थांबवावं.

Updated: May 19, 2012, 04:04 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

जाहिरात व्यवसायिक आणि अभिनेते सुहेल सेठ यांनी सिनेक्षेत्रातल्या दोन मोठ्या व्यक्तींशी पंगा घेतला आहे. सुहेल सेठला वेगवेगळ्या चर्चात्मक कार्यक्रमात तुम्ही पाहिलं असेलच. तर या सुहेल सेठने आता महेश भट्ट आणि सुभाष घई यांच्यासारख्या प्रसिद्ध फिल्म मेकर्सवर हल्लाबोल केला आहे.

 

१६ मे ला इंटरनेटवर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये तर सुहेल सेठने कहरच केला. सुहेलने विद्या बालनचा ‘कहानी’ सिनेमा पाहिला. विद्याच्या अभिनयावर आणि सिनेमाच्या छायांकनावर सुहेल बेहद्द फिदा झाले. पण 'कहानी'वर स्तुतीसुमनं उधळता उधळता त्यांनी एक धक्कादायक विधान केलं. सुहेल सेठ म्हणाले, “सगळ्या महेश भट्ट आणि सुभाष घईंना माझी सूचना आहे की त्यांनी आता कास्टिंग काऊच करणं थांबवावं. या क्षेत्रात या गोष्टी करण्यापेक्षा चांगलं स्क्रीप्ट लिहिणाऱ्या माणसांमध्ये गुंतवणूक करा.”

 

भट्ट आणि गईंनी जरी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सुहेल सेठ यांनी थेट कास्टिंग काऊचचा आरोप केल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. नेमकं सत्य काय आहे, यावर सगळ्यांचाच गोंधळ उडाला आहे.