द डर्टी पिक्चर नव्हे तर प्रमोशन

द डर्टी पिक्चर संसदेत असं म्हटल्यावर जे चित्र क्षणार्धात तुमच्या डोळ्यासमोर तरळलं असेल ते ताबडतोब मनातून काढून टाका, कारण संसदेतील खासदारांच्या ओंगळवाण्या वर्तणुकीबद्दलची ही बातमी नाही. सिनेमा प्रमोशनसाठी निर्माती एकता कपूर काय करु शकते हे तिने दाखवून दिलं आहे. द डर्टी पिक्चरचा लीड ऍक्टर इम्रान हाश्मी बुधवारी सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट संसदेत पोहचला.

Updated: Nov 23, 2011, 03:15 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

द डर्टी पिक्चर संसदेत असं म्हटल्यावर जे चित्र क्षणार्धात तुमच्या डोळ्यासमोर तरळलं असेल ते ताबडतोब मनातून काढून टाका, कारण संसदेतील खासदारांच्या ओंगळवाण्या वर्तणुकीबद्दलची ही बातमी नाही. सिनेमा प्रमोशनसाठी निर्माती एकता कपूर काय करु शकते हे तिने दाखवून दिलं आहे. द डर्टी पिक्चरचा लीड ऍक्टर इम्रान हाश्मी बुधवारी सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट संसदेत पोहचला.

लोकशाहीच्या मंदिरात सिल्क स्मिताच्या आयुष्यावरच्या सिनेमाचे प्रमोशन हे ऐकल्यावर डोक्याला हात लावण्याव्यतिरिक्त आपण काय करु शकतो? गेल्या काही वर्षात संसदेतील खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे या वास्तुचे पावित्र्य लयाला गेलं आहे आणि त्यामुळे एकता कपूरसारख्या लोकांची भीड चेपली आहे. इम्रान या अनोख्या सिने प्रमोशन बद्दल पत्रकारांना म्हणाला की सर्व मार्गाचा अवलंब करुन झाल्यानंतर मी संसदेत आलो आहे. इम्रान हाश्मी किंवा एकता कपूर सारखे बाजारबुणगे सिनेमाचा व्यवसाय नव्हे तर धंदा करण्यासाठी कोणत्या थराला जावू शकतात त्याचे हे विदारक दर्शन. कालाय तस्मै नम: