ट्विट : ‘डर्टी पिक्चर' अश्लील आहे का?

ज्या ‘डर्टी पिक्चर' ला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाला आहे. तो चित्रपट टीव्हीवर का दाखवू नये, असा सवाल बॉलिवूडमधील मंडळींनी उपस्थित केला आहे.

Updated: Apr 23, 2012, 05:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

ज्या ‘डर्टी पिक्चर' ला राष्ट्रीय पातळीवर  पुरस्कार मिळाला आहे. तो चित्रपट टीव्हीवर का दाखवू नये, असा सवाल बॉलिवूडमधील मंडळींनी उपस्थित केला आहे. कर्नाटक आणि गुजरात राज्यात मंत्री विधानसभेत पॉर्न क्लिप पाहू शकतात तर नागरिकांनी ‘डर्टी पिक्चर' चित्रपट का पाहू नये, असे खडे बोल चित्रपट सृष्टीतील अनेकांनी ट्विटरवर विचारले आहेत.

 

 

विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट  ‘डर्टी पिक्चर' हा टीव्हीवर रविवारी दाखविण्यात येणार होता. मात्र, यावर एका पालकांने आक्षेप घेतल्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा चित्रपट रात्री उशिरा दाखविण्यात यावा, अशी सूचना केल्यानंतर वाहिनीने चित्रपटाचे प्रसारण स्थगित केले होते. यावरून चित्रपटसृष्टीतील अनेकांनी नाराजी व्यक्त करताना ट्विट  केले आहे, ‘डर्टी पिक्चर' अश्लील आहे का?

 

 

आपण सिनेमात बलात्कार पाहात आहोत, आठ वर्षांची मुलगी ४० वर्षांच्या नागरिकाबरोबर लग्न करताना पाहतो. अश्लील रिऍलिटी शो पाहू शकतो. मात्र एका महिलेची कहाणी असलेला चित्रपट पाहू शकत नाही का, असे चित्रपट निर्माती एकता कपूरने ट्विटरवर  पोस्ट केले आहे.

 

काय आहे ट्विट..

 

अभिनेत्री नेहा धुपिया  

‘डर्टी पिक्चर'चे प्रसारण का थांबविण्यात आले? या नेत्यांना कसला त्रास आहे?

निर्माता करण जोहर

राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटाचे प्रसारण थांबविण्यात आले, ही काय लोकशाही आहे का?

राम गोपाल वर्मा 

अश्लील व्हिडिओ पाहिलेले चालतात. मात्र, हा चित्रपट चालत नाही.

सोनम कपूर 

So, Dirty Picture wsnt aired finally. Never had a more ineffective, incapable & nikkamma ..