'जिस्म' सनी लिऑनचं, आवाज पूजा भट्टचा

भरपूर अंगप्रदर्शन आणि थोडाफार अभिनय सनी कशीबशी करेल.. पण या कॅनडियन पॉर्न स्टारला हिंदीत संवाद म्हणायला कसं जमणार? शेवटी हा प्रश्नही पूजा भट्टने आपल्या पद्धतीने सोडवलाय. आता पूजा भट्टच सनी लिऑनला आवाज देणार आहे.

Updated: Jun 4, 2012, 08:50 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

सनी लिऑनला घेऊन पूजा भट्ट जिस्म-२ दिग्दर्शित करतेय, हे तर सगळ्यांना माहित आहेच. ‘जिस्म-२’मध्ये सनी लिऑन अभिनयाचे धडे गिरवतेय. पण, डायलॉग्सचं काय? भरपूर अंगप्रदर्शन आणि थोडाफार अभिनय सनी कशीबशी करेल.. पण या कॅनडियन पॉर्न स्टारला हिंदीत संवाद म्हणायला कसं जमणार? शेवटी हा प्रश्नही पूजा भट्टने आपल्या पद्धतीने सोडवलाय. आता पूजा भट्टच सनी लिऑनला आवाज देणार आहे.

 

 

“माझे बाबा आणि युनिटमधले बाकी लोक म्हणाले की नेहमीचे डबिंग आर्टिस्ट वापरण्यापेक्षा काहीतरी वेगळं करू. त्यामुळे मीच सनीचं डबिंग करायचं ठरवलं.” असं पूजा भट्ट म्हणाली.जिस्म-२ची कथा महेश भट्ट यांनीच लिहिली असली तरी, त्यातील सनी लिऑनचं इझ्ना हे पात्र पूजा भट्टचीच कल्पना असल्याचं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याच डोक्यातील पात्राला आवाज देणं फारसं कठीण नसल्याचं पूजा भट्टचं म्हणणं आहे.

 

डोळ्यांसमोर सनी लिऑन आणि कानात पूजा भट्टचा आवाज अशी जोडी अनुभवायला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी हा सिनेमा आणखी वेगळ्या पातळीवरचा अनुभव असेल. असं पूजा भट्टला वाटतंय. मात्र “सिनेमातील ‘बोल्ड’ डायलॉग्ज म्हणताना तू कम्फर्टेबल असशील का?” असं विचारलं असता पूजा भट्टने उत्तर दिलं की “बघू, मी ही एक स्त्रीच आहे. माझं मन कधीही बदलू शकतं.”