किंग खान आणि हृतिकमध्ये अग्निपथ

शाहरुख खानने शिरीष कुंडरच्या श्रीमुखात भडकावल्याच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले आणि चॅनेलवर त्यासंबंधीच्या बातम्यांचा पाऊस पडला. आता किंग खान हृतिक रोशनवर संतापला आहे.

Updated: Feb 12, 2012, 09:37 AM IST

www.24taas.com, मुंबई
शाहरुख खानने शिरीष कुंडरच्या श्रीमुखात भडकावल्याच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले आणि चॅनेलवर त्यासंबंधीच्या बातम्यांचा पाऊस पडला. आता किंग खान हृतिक रोशनवर संतापला आहे.

हृतिकने गौरी खानबद्दल केलेल्या ट्विटमुळे किंग खान नाराज झाला आहे. गौरी खान बॉलिवूडच्या अभिनेत्रींना कडवं आव्हान देऊ शकते असं हृतिकचे म्हणणं आहे. त्याशिवाय किंग खानला धुम्रपानाची सवय सुटण्यासाठी हृतिकने एक पुस्तकही सूचवलं आहे.

गौरी खान ही जगातली सर्वात सुंदुर आणि टँलेंटेड मुलगी असल्याचं हृतिकचं म्हणणं आहे. हे तर काहीच नाही ती हॉट असल्याचंही त्याने टविट केलं आहे. किंग खानच्या पत्नीची इतक्या खुल्या दिलाने हृतिकने तारीफ केल्यानंतर तो वैतागणार नाही तर काय ? येत्या काही दिवसात किंग खान आणि हृतिक रोशनमधले संबंध कोणतं वळण घेतात ते दिसून येईलच.