किंगची उतरली झिंग

Updated: Oct 29, 2011, 11:16 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

शाहरुख खानच्या रा-वनने रिलीजनंतर पहिल्या तीन दिवसातच नफा कमवण्याची किमया करुन दाखवल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे पण वास्तव वेगळं असल्याचं या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणं आहे. रा-वनच्या निर्मितीवर तब्बल १२० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाले आहेत. त्यामुळेच साऱ्या बॉलिवूडच्या हदयाची धडधड वाढली होती. रा-वनचे निर्माते इरोस इन्टरनॅशनलचे किशोर लुल्ला यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलाय की या सिनेमाने आजवर दिवाळीत प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांचे विक्रम मोडीत काढले आहे.

शाहरूख खानच्या रा-वनची तुलना काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या बॉडीगार्डशी करण्यात येत आहे. बॉडीगार्डने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २१ कोटी पन्नास रुपयांचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर करण्याचा विक्रम नोंदवला. तर रा-वनने पहिल्या दिवशी १८ कोटी ५० लाख रुपये तर दुसऱ्या दिवशी २५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रा-वनच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आधारे या सिनेमाने अपेक्षेपेक्षा कमी व्यवसाय केल्याच्या चर्चांना उत आला. सोशल मीडिया, इंटरनेटवरील चॅटच्या माध्यमातून रा-वन बद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या तर तिरकस टीका टिपण्णी आणि जोक्सनी जोर धरला.

शाहरुख खानच्या कोणत्याही सिनेमाने १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला नाही. तर सलमान खानच्या तीन सिनेमांनी हा जादुई आकडा पार करण्याचा विक्रम करुन दाखवला आहे.

शाहरुख खानला रा-वनकडून प्रचंड अपेक्षा होत्या पण रा-वनचे निर्माते दावा करत असले तरी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कलेक्शन करता आलेलं नाही. देशभरात तब्बल ३१०० सिनेमागृहात रा-वन झळकला असला तरी तज्ञांच्या मते फक्त १५ कोटी रुपयांचाच गल्ला गोळा झाला. रा-वनला १०० कोटी रुपायांचा टप्पा गाठणं अवघड जाणार आहे. ब्लॅकवाल्यांना या सिनेमातून भरपूर कमाई होईल ही आशाही फोल ठरली आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही काळी दिवाळी ठरली आहे. शनिवारी आणि रविवारीही जर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला नाही तर रा-वनचं काही खरं नाही हे नक्की.

शाहरुख खानच्या रा-वनने रिलीजनंतर पहिल्या तीन दिवसातच नफा कमवण्याची किमया करुन दाखवल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे पण वास्तव वेगळं असल्याचं या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणं आहे. रा-वनच्या निर्मितीवर तब्बल १२० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाले आहेत. त्यामुळेच साऱ्या बॉलिवूडच्या हदयाची धडधड वाढली होती. रा-वनचे निर्माते इरोस इन्टरनॅशनलचे किशोर लुल्ला यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलाय की या सिनेमाने आजवर दिवाळीत प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांचे विक्रम मोडीत काढले आहे.

शाहरूख खानच्या रा-वनची तुलना काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या बॉडीगार्डशी करण्यात येत आहे. बॉडीगार्डने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २१ कोटी पन्नास रुपयांचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर करण्याचा विक्रम नोंदवला. तर रा-वनने पहिल्या दिवशी १८ कोटी ५० लाख रुपये तर दुसऱ्या दिवशी २५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रा-वनच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आधारे या सिनेमाने अपेक्षेपेक्षा कमी व्यवसाय केल्याच्या चर्चांना उत आला. सोशल मीडिया, इंटरनेटवरील चॅटच्या माध्यमातून रा-वन बद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या तर तिरकस टीका टिपण्णी आणि जोक्सनी जोर धरला.

शाहरुख खानच्या कोणत्याही सिनेमाने १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला नाही. तर सलमान खानच्या तीन सिनेमांनी हा जादुई आकडा पार करण्याचा विक्रम करुन दाखवला आहे. शाहरुख खानला रा-वनकडून प्रचंड अपेक्षा होत्या पण रा-वनचे निर्माते दावा करत असले तरी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कलेक्शन करता आलेलं नाही. देशभरात तब्बल ३१०० सिनेमागृहात रा-वन झळकला असला तरी तज्ञांच्या मते फक्त १५ कोटी रुपयांचाच गल्ला गोळा झाला. रा-वनला १०० कोटी रुपायांचा टप्पा गाठणं अवघड जाणार आहे. ब्लॅकवाल्यांना या सिनेमातून भरपूर कमाई होईल ही आशाही फोल ठरली आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही काळी दिवाळी ठरली आहे. शनिवारी आणि रविवारीही जर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला नाही तर रा-वनचं काही खरं नाही हे नक्की.

किंगची उतरली झिंग