बीएमएमचे १६वे अधिवेशन जाहीर

अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचे (बी.एम.एम.) १६वे अधिवेशन ५ ते ७ जुलै २०१३ दरम्यान होणार आहे. हे अधिवेशन बॉस्टनलगतच्या र्‍होड आयलंड राज्यातील प्रॉव्हिडन्स शहरात होणार आहे. या अधिवेशनाचे आयोजन बॉस्टन येथील न्यू इंग्लंड मराठी मंडळ करत आहे.

Updated: Jun 11, 2012, 08:23 PM IST

www.24taas.com, बॉस्टन

 

अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचे (बी.एम.एम.)१६वे अधिवेशन ५ ते ७ जुलै २०१३दरम्यान  होणार आहे. हे अधिवेशन  बॉस्टनलगतच्या र्‍होड आयलंड राज्यातील प्रॉव्हिडन्स शहरात होणार आहे. या अधिवेशनाचे आयोजन बॉस्टन येथील न्यू इंग्लंड मराठी मंडळ करत आहे.

 

अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाने जुलै २०१३ मध्ये होणार्‍या अधिवेशनासाठी प्रॉव्हिडन्स इथल्या र्‍होड आयलंड कन्व्हेंशन सेंटरशी नुकताच करार करण्यात आला. यावेळी झालेल्या समारंभाला प्रॉव्हिडन्स शहराचे महापौर अँजेल तव्हेरास, बी.एम.एम.चे अध्यक्ष आशिष चौघुले आणि अधिवेशनाचे निमंत्रक बाळ महाले उपस्थित होते.

 

या अधिवेशनाला चार हजारांहून  अधिक मराठीप्रेमी उपस्थिती लावतील  असा अंदाज आहे. आता पर्यंत  न्यूयॉर्क, लॉस एंजल्स,  सिअ‍ॅटल, अटलांटा, फिलाडेल्फिया, शिकागो आदी शहरांत बी.एम.एम.ची अधिवेशने झाली  आहेत.

 

हे अधिवेशन आमच्या शहरात आयोजित करण्यात येत आहे याचा मला अतिशय आनंद होत असून, उपस्थितांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी आम्ही सर्वजण झटून प्रयत्न करु, अशी ग्वाही प्रॉव्हिडन्स शहराचे महापौर अँजेल तव्हेरास यांनी दिली आहे. भव्य आणि दिमाखदार अधिवेशनांच्या बी.एम.एम. च्या परंपरेला साजेशा अशा एका संस्मरणीय अधिवेशनाचा आनंद जगभरातल्या तसंच अमेरिकेतल्या मराठीजनांना देण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 

[caption id="attachment_118502" align="alignleft" width="300" caption="र्‍होड आयलंड कन्व्हेंशन सेंटरशी झालेल्या करारावर स्वाक्षरी करताना बी.एम.एम.चे अध्यक्ष आशिष चौघुले, सोबत प्रॉव्हिडन्सचे महापौर अँजेल तव्हेरास आणि अधिवेशनाचे निमंत्रक बाळ महाले"][/caption]

अधिवेशनाचे प्रायोजक कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने स्वीकारले आहे. 'ऋणानुबंध' ही यावेळच्या अधिवेशनामागची संकल्पना असून, आयोजकांनी निवडलेल्या प्रतीक चिन्हातून आणि घोषवाक्यातून ही संकल्पनाच अधोरेखित करण्यात आली आहे.

 

'नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी' हे प्रॉव्हिडन्स इथं होणार्‍या बी.एम.एम.च्या १६ व्या अधिवेशनाचं घोषवाक्य आहे. या अधिवेशनाची वेबसाईट तयार झाली असून  www.bmm2013.org   अधिक माहिती येथे मिळेल. तसेच  https://www.facebook.com/bmm2013  या ठिकाणी अधिवेशनाच्या तयारीची माहिती देण्यात येणार आहे.