www.24taas.com, सोलापूर
'अविनाश अभ्यंकर यांचा मनमानी कारभार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अरेरावीला कंटाळून सुभाष पाटील यांनी हा राजीनामा दिला'. 'मला राज ठाकरेयांच्यापर्यंत पोहचू दिले नाही, निवडणूक जवळ आली असतानाही योग्य यंत्रणा राबवू दिली जात नाही'. असं सागंत सोलापूरचे मनसेचे शहरअध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे सोलापूरमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता मनेसेतील अनेक कार्यकर्ते बाहेर पडले आहेत.
सोलापूरचे मनसेचे शहरअध्यक्ष सुभाष पाटील यांनी जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश अभ्यंकर तसेच शहरातील पदाधिकारी यांना कंटाळून ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला राम राम ठोकला आहे. तसेच एखादी यंत्रणा राबवायची असल्यास त्याला प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत असून मनसेतून बाहेर पडत आहे , असे सुभाष पाटील यांनी जाहीर केले.
सुभाष पाटील यांच्या समर्थकांनीसुद्धा सर्व पदाचा राजीनामा दिला. त्यामध्ये पालिका निवडणुकीसाठी मनसेचे तिकीट मिळालेलेसुद्धा कार्यकर्त्याचा समावेश आहे. सुभाष पाटील यांच्यासोबत सोलापुरातील २५०० ते ३००० कार्यकर्ते आहेत .