मुंबई : 'झी मराठी दिशा' च्या वाचकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी आम्ही घेऊन आलो आहोत. यासाठी काही स्पर्धांमध्ये तुम्हाला सहभाग घ्यावा लागणार आहे.
'बलशाली भारतासाठी मी काय करू शकतो/ शकते?' तरुणांनो व्यक्त व्हा आणि ३०० शब्दांपर्यंत लेख लिहून पाठवा.
तुमचे लेख आमच्यापर्यंत १० जानेवारीपर्यंत पोहोचले पाहिजेत, अशा पद्धतीने पाठवा. ही स्पर्धा १८ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी आहे.
'झी मराठी दिशा'अंतर्गत तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 'चौकस-चौरस संग्रह स्पर्धा' घेण्यात येत आहे. चौकस चौरस पानावरील बोधकथा, श्लोककथा, शब्द गंमत, नवल आणि परिसर परिचय ही पाच सदरे वाचून त्याची कात्रणे वाचून त्याची संग्रहवही करायची आहे.
६ जानेवारी ते ३० एप्रिल २०१८ हा स्पर्धेचा कालावधी असेल. ७ मे २०१८ पर्यंत ही संग्रहवही आमच्याकडे पाठवायची आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळतील.
तुमचा लेख zeemarathidisha@dnaindia.net या ईमेलवर पाठवा
किंवा झी मराठी दिशा,मॅरेथॉन फ्युचरेक्स, ए-विंग, १४वा मजला,ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई - ४०० ०१३. या पत्त्यावर पाठवू शकता.