दुर्घटनेतील मृतांच्या चेहऱ्यावर का टाकले नंबर ?

 केईएम प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 30, 2017, 12:31 PM IST
दुर्घटनेतील मृतांच्या चेहऱ्यावर का टाकले नंबर ?  title=

मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. केईएम रुग्णालयाच्या बाहेर लावलेल्या एका बॅनरमध्ये मृत व्यक्तींचे चेहरे लावण्यात आले होते. मृत व्यक्तींच्या कपाळावर क्रमाक देण्यात आले होते. त्यानंतर केईएम प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली.

हा बॅनर सोशल मीडियावर पसरत गेला आणि अतिशय असंवेदनशील, निंदनीय कृत्य असल्याची चर्चा झाली.
एका युजरने ट्विट केले की, 'केईएम रुग्णालयात मृतदेह ओळखण्यासाठी व त्यांची संख्या मोजण्यासाठी हे नंबर लिहिले आहेत का ? हे खूप क भयावह आहे. मृतांप्रती काही आदर नाही.'आणखी एका ट्विटवर म्हटले गेले की,  झालेली घटना ही दुर्देवीच आहे पण मृतांप्रति अधिकाऱ्यांचे वर्तन अधिकच वेदनादायक आहे.रुग्णालय प्रशासनाच्या अशाप्रकारच्या कामामूळे २२ मृतांच्या कुटुंबियांना हा अजून एक मानसिक आघात होता.
'आम्ही सर्व मृतदेहांचे फोटो त्यांच्या नातेवाईकांना लॅपटॉप स्क्रीनवर दाखविले. त्यानंतर तो बोर्ड लावण्यात आल्याचे सांगत बचावात्मक पावित्रा प्रशासनातर्फे घेण्यात आला. केईएम फॉरेन्सिक विभागातर्फे सांगण्यात आलेल्या माहितीनूसार पोस्टमार्टनंतर ते आकडे काढून टाकण्यात आले. मृत व्यक्तींची जलद, सन्मानात व चांगल्याप्रकारे ओळख पटण्यासाठी रुग्णालयाने वैज्ञानिक पद्धत वापरली होती.