कांद्याच्या किमती सततच का वाढतात?

 कांद्याला चक्क 4 हजार वर्षांपेक्षाही प्रदीर्घ काळची पार्श्वभूमी आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 3, 2017, 12:13 PM IST
कांद्याच्या किमती सततच का वाढतात? title=

मुंबई : सध्याच नव्हे तर, अनेकदा देशात कांद्यांच्या किमती गगनाला भिडतात आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी तरळू लागते. कांदा महागाल की, सर्वत्रच टीका आणि चर्चांचा महापूर येतो. आपणही त्यातला एक घटक होऊन जातो. पण, तुम्हाला माहित आहे का, कांद्याचा भाव सततच का वधारलेला असतो? का सतत का महागतो कांदा?

कांद्याला आहे ऐतिहासीक पार्श्वभूमी

कोणताही पदार्थ, वस्तू, व्यक्ती किंवा फळ, फळभाजी. जगातल्या प्रत्येक गोष्टीका काही ना काही पार्श्वभूमी असतेच. ती कांद्यालाही आहे. पण, गंमत अशी की, कांद्याला चक्क 4 हजार वर्षांपेक्षाही प्रदीर्घ काळची पार्श्वभूमी आहे. जवळपास जगभरातील प्रत्येक देशात काद्याचे उत्पन्न घेतले जाते. जगभरातील सवळपास सर्वच प्रकारच्या मसालेदार पदार्थात कांद्याचा वापर केला जातो. सन 2011मध्ये संयुक्त राष्ट्रने कांद्याबाबत एक अभ्यास केला. या अभ्यासात आढळून आले की, प्रत्येक व्यक्ती वर्षाकाठी 33.6 किलो कांदा खातो. अनेक देशांमध्ये कांद्याला पौष्टिक खाद्य म्हणून ओळखले जाते. जगभरातील उत्पन्व विचारात घेतल्यास प्रतिवर्षी साधारण सात कोटी टन कांदा उत्पादित केला जातो. विशेष असे की, भारत आणि चीन या दोन देश कांदा उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहेत. हे दोन देशच जगाच्या तुलनेत 45 टक्के कांदा उत्पादन घेतात.

कांदा आहे पैष्टीक

डॉक्टर दावा करतात की, कांदा आरोग्याला चागला असून, तो पौष्टीक आणि बलवर्धक असतो. यात व्हिटॅमीन 'सी'ची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. अहारशास्त्राचे अभ्यासक सांगतात की, 100 ग्रॅम कांद्यात 4 मिलीग्रॅम सोडियाम, 1 मिलीग्रॅम प्रोटीन, 9-10 मिलीग्रॅम कार्बो हायड्रेड आणि सुमारे 3 मिलीग्रॅम फायबर असते. जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. अनेकदा डॉक्टरही कांदा खाण्याचा सल्ला देतात. आरोग्य शास्त्राचे अभ्यासक असेही सांगतात की, कांद्यात अँटी ऑक्सिडेंटची मात्रा अधीक असते. त्यामुळे कॅन्सर (कर्करोग) असलेल्या व्यक्तिने कांद्याचे अधिक सेवन करावे.

कांद्याचे दर वाढतात का?

कांद्याचे दर वाढतात का? या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. विविध क्षेत्रातले तज्ज्ञ ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. पण, वास्तव असे की, कांद्याचे उत्पादन शेतीमध्ये घेतले जाते. भारतासारख्या देशात शेती हा अत्यंत बेभरवशाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दुष्काळ, पाऊस, ढगफुटी, रोगराई या सर्वांचा सामना करत शेतकऱ्याला कांद्याचे उत्पादन घ्यावे लागते. त्यात कांदा हे अत्यंत नाश्वर पीक. भारतात त्याची साठवणूक करण्यासाठी आणि आयुष्य वाढविण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कांदा बाजारात आला की, शेतकऱ्याला तो विकावाच लागतो. भले त्याला दर कितीही मिळाला तरी. शेतकऱ्याच्या असहायतेचा फायदा ठेकेदार, व्यापारी घेतात. शेतकऱ्यांना जागतीक, किंवा देशांतर्गत बाजारपेठेचे गेणीत ध्यानात येत नाही. आलेच तर, त्याची गरज त्याला कांदा विकण्यास भाग पाडते. त्यामुळे शेतकऱ्याला कादा विकताना अनेकदा तोट्याचाच सामना करावा लागतो. 
वर उल्लेख झालेली आणि उल्लेख न झालेलीही अनेक कारणे कांदा उत्पादनावर प्रभाव टाकतात. त्याचा परिणा कांद्याच्या उत्पादनावर होता. कधी कांद्याचे उत्पदन अपेक्षेपेक्षा अधिक होते. कधी फारच कमी. कांद्याचे उत्पादन अधिक झाले की, बाजारात कांद्याची आवक वाढते. कांदा स्वस्त होतो. कांद्याचे उत्पदन घटले की, बाजारातील आवकही घटते. परिणामी कांदा महागतो.

मार्केट ते किचन कांदा कसा महागतो

कांदा महागाईचे सर्वसाधारण गणीत समजवून घेता येऊ शकते. जसे की, उदा. महाराष्ट्रातील लासलगाव मार्केटमध्ये शेतकऱ्याचा कांदा 26 रूपये प्रती किलोने व्यापाऱ्याने विकत घेतला. तर, किचनपर्यंत पोहोचेपर्यंत कांदा तब्बल 50 ते 60 रूपये प्रती किलोवर पोहोचलेला असतो. लासलगावमध्ये कांदा 26 रूपयांना खरेदी केला जातो. दिल्लीचा रिटेलर व्यापारी तो 30 त 32 रूपयांना खरेदी करतो. पण, ही विक्री करताना तो वाहतूक, हमाली, साठवणूक असा अनेक गोष्टींचा दर लावतो. जो व्यापाऱ्यांच्या सामुहीक आणि व्यावसायी हिंतसंबंधातून ठरतो. बाजारात जर कांद्याचे उत्पन्न कमी असेल तर, ही शक्यता अधिक वाढते अशा पद्धतीने 26 रूपयांचा कांदा किचनपर्यंत पोहोचेपर्यंत 50 ते 60 रूपये प्रती किलोच्या घरात पोहोचलेला असतो.