मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

जाणून घ्या मेगाब्लॉकची वेळ आणि मार्ग

Updated: Aug 5, 2018, 08:59 AM IST
मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक title=

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आज (रविवार) घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सकाळी सव्वा आकरा ते सव्वा चार वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुज ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर मार्ग

कुठून कुठेपर्यंत: पनवेल ते वाशी अप व डाऊन मार्ग
 वेळ: स. ११.३० ते सायं. ४.३० वा

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठून कुठेपर्यंत: मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग
 वेळ: स.११.१५ ते सायं ४.१५

पश्चिम रेल्वे

कुठून कुठेपर्यंत: सांताक्रुझ ते माहीम अप व डाऊन जलद मार्ग
 वेळ: स.१०.३५ ते दु. ३.३० वा