VIDEO : मेट्रो, मोनो पाठोपाठ आता मुंबईत 'रोप वे' वाहतूक

मेट्रो, मोनो पाठोपाठ आता मुंबईत 'रोप वे' वाहतूक सुरु होणार आहे.

Updated: Feb 13, 2018, 09:03 PM IST
VIDEO : मेट्रो, मोनो पाठोपाठ आता मुंबईत 'रोप वे' वाहतूक   title=

मुंबई : मेट्रो, मोनो पाठोपाठ आता मुंबईत 'रोप वे' वाहतूक सुरु होणार आहे.

सुरुवातीला शिवडी न्हावा शेवा-उरण अशी वाहतूक सुरु करण्यात येणार असून त्यानंतर या रोप वेचा उरणपर्यंत विस्तार करण्यात येईल. कसा असेल हा रोप वे याची एक्स्क्लुझिव्ह माहिती 'झी २४ तास'कडे उपलब्ध झाली आहे. नितीन गडकरींनी ही संकल्पनाच मुंबईत एका कार्यक्रमात उलगडून सांगितली 

मुंबई आणि महाराष्ट्रत रोप वे हा वाहतुकीचा नवीन पर्याय येत्या काळात पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे ६ ते २५० लोक बसतील अस 'रोप वे'चे केबिन असणार आहेत. 

एसी आणि नॉन एसी असे केबिनही असणार आहेत. रोप वेचे मार्ग राज्य सरकार ठरवेल, तर त्याची अंमल बजावणी इंडीयन रेल पोर्ट कॉर्पोरेशन करणार आहे. त्यामुळे परदेशाप्रमाणे विकसित रोपवे आपल्याकडे ही येत्या काळात पाहायला मिळणार आहेत