मुंबई : राज्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे सोमवार 7 जूनपासून पाच लेव्हरमध्ये अनलॉक होत आहे. तसे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र, मुंबईत अनलॉकबाबत (Mumbai Unlock) परिस्थिती आहे का, चर्चा सुरु होती. मुंबई अनलॉकबाबत महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आता आपण तिसऱ्या टप्प्यात आहोत. मुंबईला लेव्हल एकवर यायला काही आठवडे जातील. त्यामुळे मुंबईत अनलॉक होण्यास उशिर लागणार आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील नियमावली लागू होणार आहे.
राज्यात कोरोना धोका कमी होत आहे. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पा्च लेव्हल ठरविण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजन बेड यानुसार जिल्ह्याची लेव्हल ठरवली जाणार आहे. यामध्ये मुंबई कोणत्या स्तरावर आहे, असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई सध्या तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. यानुसार, संबंधित नियमावली मुंबई महानगरपालिका संध्याकाळपर्यंत जारी करेल, असेही महापौरांनी म्हटले आहे.
मागील दोन आठवड्यांपासून मुंबईचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 5.30 टक्के आहे तर ऑक्सिजन बेडचा वापर हा 03-40 टक्क्यांवर होत आहे. यामुळे मुंबई सध्या तिसऱ्या टप्प्यावरुन असून आणखी काळजी घेण्याची गरज असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या. टप्प्यानिहाय विचार करता मुंबई आणि ठाणे हे जिल्हे तिसऱ्या लेव्हलमध्ये येतात. त्यामुळे लोकल ट्रेन सुरु होण्यासाठी मुंबई आणि ठाणेकरांना वाट पाहावी लागणार आहे. त्या-त्या वेळी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, करोना रुग्ण बरे होण्याचा मुंबईतील दर 95 टक्क्यांवर पोहोचला असला तरी आजही रुग्णवाढ जवळपास हजारांच्या घरात आहे. शुक्रवारी मुंबईत 973 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या मुंबईत 16347 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.