दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला, ईडीच्या हाती महत्त्वाची माहिती

दाऊदचा भाचा अलीशाह पारकरने ईडीला दिलेल्या जबानीत महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती लागली आहे

Updated: May 24, 2022, 01:53 PM IST
दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला, ईडीच्या हाती महत्त्वाची माहिती title=

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) कराचीतच (Karachi) असल्याचं उघड झालंय. दाऊदचा भाचा अलीशाह पारकरने (Alishah Parkar) ईडीला (ED) दिलेल्या जबानीत हे उघड केलंय. दाऊदची बहीण हसिना पारकरचा (Hasina Parkar) मुलगा अलीशाह पारकर सध्या ईडीच्या ताब्यात आहे. त्याने दाऊद कराचीतच असल्याची माहिती दिलीय. एवढंच नाही तर दाऊदची पत्नी पारकर कुटुंबाला सणासुदीला फोन करून पारकर कुटुंबाची चौकशी करते अशीही माहिती अलीशाहने दिलीय. 

मनी लाँड्रिंग (Money Laundring) प्रकरणात हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर ईडीच्या ताब्यात आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे तो 1986 नंतर भारत सोडून गेला होता अशी माहिती अलीशाहने ईडीला दिली आहे. हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे. पण त्यांचं कुटुंब दाऊदच्या संपर्कात नाही. दाऊदची पत्नी मेहजबीन सणांच्या वेळी अलीशाहची पत्नी आणि बहिणींशी संपर्क साधते अशी माहिती अलीशाहने दिली आहे.

दाऊद 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. अलीशाहच्या म्हणण्यानुसार, दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये असल्याचं मी विविध लोकांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकलं आहे, असं अलीशाहने ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत मुंबईतील विशेष न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. केंद्रीय तपास संस्थेने या प्रकरणी मलिक यांच्याविरुद्ध 5 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केली आहे.