शाळेचा बॅनर लावताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

नवीन बॅनर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंतीवर लावण्यासाठी शाळा प्रशासन या तीन तरुणांना सांगितलं 

Updated: Dec 16, 2018, 12:14 PM IST
शाळेचा बॅनर लावताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू  title=

मुंबई : शाळेचा बॅनर लावणाऱ्या तरुणाला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मध्ये गुरुनानक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेचं नाव असलेलं जुना बॅनर काढून नवीन बॅनर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंतीवर लावण्यासाठी शाळा प्रशासन या तीन तरुणांना सांगितलं होतं. त्यासाठी या तरुणांना शाळा  २०० रूपये देणार होती.

शाळा प्रशासनावर आरोप 

 सकाळी हे तरुण बॅनर लावण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढले असता शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात हा बॅनर आला आणि त्याचामुळे विजेता धक्का बसून प्रमोद पंडित या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.तर दुसरा अल्पवयीन मुलगा जखमी आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनानं पळ काढल्याचा आरोप जखमी तरुणानं केला आहे.