मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आगामी काळात काय 

Updated: Dec 23, 2019, 01:07 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची पहिली बैठक शिवसेना भवनात सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असून ते सर्व जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतायत. भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता जिल्हा पातळीवरचीही राजकीय समीकरणं बदलली आहेत.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आगामी काळात काय राजकीय रणनिती असावी याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. 

तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळं आणि सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीनं कुठला कार्यक्रम हाती घ्यायला हवा आणि शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी लक्ष ठेवण्यासंदर्भातही मार्गदर्शन केलं जाणार आहे.