अमित ठाकरेंच्या सारखपुड्याला उद्धव ठाकरे अनुपस्थित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा झाला.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 11, 2017, 02:33 PM IST
अमित ठाकरेंच्या सारखपुड्याला उद्धव ठाकरे अनुपस्थित title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा झाला.

उद्धव ठाकरे अनुपस्थित

उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहतील का याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता होती. पण अमित ठाकरेंच्या सारखपुड्याला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. महालक्ष्मी रेसकोर्सवर टोड्स हॉटेलमघ्ये अमित ठाकरेचा साखरपुडा झाला. कुटुंबातील मोजक्या व्यक्तींनाच आमंत्रण देण्यात आले आहे.

कोण-कोण होते उपस्थित

चंदुमामा वैद्य आणि स्मिता ठाकरे या सोहळ्याला उपस्थित होते. हा खाजगी आणि छोटेखाना कार्यक्रम होता. काही धार्मिक विधी झाल्यानंतर अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांनी एकमेकांच्या बोटात अंगठी घालून साखरपुडा पार पडला. नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, राजन शिरोडकर आणि अविनाश गोवारीकर यांचे कुंटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राज ठाकरे आणि शर्मिला यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अमित आणि मिताली यांचा साखरपुडा झाला. अमित-मिताली गेली पाच वर्षे एकमेकांच्या प्रेमबंधात आहेत. महाविद्यालयीन शिक्षणावेळी एकमेकांशी सूर जुळले होते. अमित वाणिज्य पदवीधर तसेच बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण तसेच व्यंगचित्रकार आणि मनसे राजकारणात सक्रिय आहे. तर मिताली फॅशन डिजायनिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे.