मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा आज साखरपुडा संपन्न झाला.
प्रसिद्ध बालरोजतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची मुलगी मितालीसोबत हा साखरपुडा संपन्न झाला. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा सोमवारी ठरवण्यात आला. साखरपुड्याची बातमी कळताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
प्रत्येकाला राज ठाकरेंची सून मिताली बोरुडे हिच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. अमित आणि मितालीचं हे लव्ह मॅरेज आहे का? दोघांची पहिली ओळख कुठे झाली? हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्साह आहे. तर आपण जाणून घेऊया...
मिताली बोरुडे ही अमित ठाकरेची Long time girlfriend
मिताली बोरुडे ही अमितची बहिण उर्वशीची खास मैत्रिण
काही वर्षांपूर्वी उर्वशी आणि मितालीने 'The Rack' नावाचे क्लोदिंग ब्रँड सुरू केले आहे.
मिताली बोरुडे लोकप्रिय बालरोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची मुलगी
मिताली आणि अमित गेली ५ वर्षे एकमेकांना करत होते डेट
मिताली ११ वी १२ वी ला रूईया ज्युनिअर कॉलेजमध्ये होती.
मितालीने रूपारेल कॉलेजमधून डिग्री घेतली आहे.
मिताली आपल्या सासू - सासऱ्यांसोबत म्हणजे राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यासोबत युरोप टूरला देखील गेली होती.
<iframe width="970" height="545" src="https://www.youtube.com/embed/lCMBSQGXreY" frameborder="0" gesture="media" allow="encrypted-media" allowfullscreen></iframe>
मिताली आणि अमितचा विवाहसोहळा २०१८ साली होणार संपन्न