गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा इशारा

शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Updated: Jun 19, 2022, 02:08 PM IST
गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा इशारा title=

मुंबई : शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. विधानपरिषद निवडणुकीत फाटाफुट होणार नाही, असा विश्वास देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसंच गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. (Uddhav Thackeray on Shivsena Vardhapan din 2022)

राज्यसभेत एकही मत फुटलं नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल वेस्टइनमध्ये शिवसेना आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी रोजगार, अग्निपथ योजनांवरुन मोदी सरकारवर टीका केली. तर कपटाची कारस्थानं चालत नाहीत म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला

उद्धव ठाकरे म्हणाले की...

- जीवाला जीव देणारे सैनिक मिळाले. त्यामुळे बाळासाहेब यांच्यानंतर शिवसेनेचं काय याला उत्तर देत आलो आहे. 

- नगरसेवक निवडून येणं तेव्हा देखील मोठी गोष्ट वाटत होती. आता मुख्यमंत्री आपल्या आहे. आमदार आपले आहेत. शिवसेना प्रमुखांनी जी जी जबाबदारी सांगितली दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांनी ती यशस्वी पार पाडली. हात गाडीवर मार्मिक बुक स्टॉल पर्यंत नेण्याचे काम रावते करत होते. तुम्हाला निवृत्त होऊ देणार नाही. 

शिवसेना 56 वर्ष पूर्ण करतेय. निवडणूक आहेच. मला आमदारांना मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आपलेच आमदार यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. आज इथे फक्त आमदाराचं नाही आहेत तर सगळे कार्यकर्ते देखील आहेत. 

- चांगला पायलट गेला तर त्याचं नुकसान विमानापेक्षा अधिक असतं. तसंच कार्यकर्ता गेला तर नुकसान असतं. दोन सभा दणदणीत झाल्या आहे. बोलण्यासारखं खूप आहे. पण पावसामुळे मोठी सभा घेता येत नाही. उद्याच्या निवडणुकीची चिंता नाहीये. हार जीत होत असतो. उद्या तर जिंकणारचं आहोत. राज्यसभा निवडणुकीत जे झालं. एकही मत फुटलेलं नाही. कोणी काय केलं हे कळेल. शिवसेनेत गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाहीये. फाटाफुटीचं राजकारण बघत आलो आहे. शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूतीने उभी राहिली आहे.

- अनेकांनी शिवसेना मोठी केली. पण त्यांना हे वैभव भोगता आलेलं नाही. उद्धव ठाकरेला किंमत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेला महत्त्व आहे. जीवाला जीव देणारा सैनिक लाभला हे माझं भाग्य आहे. धाडसाला मरण नसतं. धाडस हा आपला स्थायी भाव आहे. 

- आणीबाणी सारखा काळ पाहिला आहे. विरोधी पक्ष तेव्हा हतबल होता. आता आपण मजबूत आहोत. हिंदुत्वाचे डंके पेटतायंत. तेव्हा बोलायला कोणी नव्हतं. आज जे चाललंय ते हिंदुत्व त्यांच्यासाठी असेल. माझ्यासाठी हिंदुत्व वेगळं आहे. 

- अनेक राज्यांमध्ये अग्निपथ विरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. हृदयात राम हाताला काम पाहिजे. नुसतं राम राम म्हणून काही होणार नाही. देहूला येऊन गेले. पण हे करुन नुसतं एकतर्फी चालत असेल. नोटबंदी झाली, शेतकरी कायदे आले त्यानंतर शेतकरी रस्त्यावर आले. सरकारला एक पाऊल मागे जायला लागलं. पूर्ण करुन देणारे वचन देता आले पाहिजे. शिवसेनेने जे ज वचन दिलं ते पाळलं. 

- महाराष्ट्र वेगळा विचार करु शकतो हे आपल्याला दाखवायचं आहे. प्रत्येकाला पर्याय असतो. शेराला सव्वाशेर असतो. राज्यसभेत दुर्दैवाने पराभव झाला.