ज्यूस विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार! लोकांच्या जीवाशी खेळ, पाहा व्हिडीओ

सावधान! तुम्ही रस्त्यावर ज्यूस पिताय? तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची 

Updated: Jun 19, 2022, 12:46 PM IST
ज्यूस विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार! लोकांच्या जीवाशी खेळ, पाहा व्हिडीओ title=

भिवंडी : बऱ्याचदा आपण भूक किंवा तहान लागली की रस्त्यावर पटकन ज्यूस घेतो. वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस हे आपल्याला आरोग्यासाठी चांगले वाटत असले तरी ते प्रत्यक्षात तसे असतील याची खात्री नाही. पैसे वाचवण्याच्या नादात आपल्या आरोग्याशी प्रतारणा करू नका. 

तुम्ही जर रस्त्यावर ज्यूस पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भिवंडी शहरातील साईबाबा मंदिरासमोर एका फळांचा जूस विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. अननस आणि आंब्याचा जूस तयार करून विकतानाचा व्हिडीओ एका नागरिकाने व्हायरल केला.

ह्या व्हिडीओमधून ज्यूस विक्रेत्याची पोलखोल झाली आहे. ज्यूस विक्रेत्याप्रती नागरिकांनी संताप व्यक्त केला. हा ज्यूस विक्रेता सडलेल्या फळांचा ज्यूस नागरिकांना विकत होता. पैशांसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं समोर आलं. हा किळसवाणा प्रकार भिवंडीमधील आहे. 

 

या प्रकरणी आता ज्यूस विक्रेत्यावर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे. ज्यूस विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तुम्ही जर बाहेर ज्यूस घेत असाल तर सावध आणि सतर्क राहा.