रेल्वे प्रवाशांसाठी ते चार तरुण ठरले देवदूत!

चार तरुणांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे मार्गावर होणारा मोठी दुर्घटना टळलीय.

Updated: Aug 30, 2017, 01:26 PM IST
रेल्वे प्रवाशांसाठी ते चार तरुण ठरले देवदूत! title=

मुंबई : चार तरुणांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे मार्गावर होणारा मोठी दुर्घटना टळलीय.

मुंबईत मंगळवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. रेल्वे पूर्णपणे ठप्प होती. मुसळधार पावसामुळे परळ, माटुंगा आणि सायन रेल्वे स्टेशनवर आणि रुळ पाण्याखाली होते. सायन स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवर कंबरेपर्यंत पाणी साचलं होतं. या सगळ्या गडबडीत मोठा अपघात होणार होता. मात्र चार देवदूत धावून आले आणि मोठा अपघात टळला.

प्लॅटफॉर्ममध्ये ट्रॅ्क ट्रॅकमध्ये लाकडी ओंडके लावले जातात... मात्र ते ओंडके ट्रॅकवर पावसाच्या पाण्याखाली अडकले होते. ही परिस्थिती सायन स्टेशनवरील चार ट्रॅकमेननं पाहिली आणि त्यांनी कसलीच परवा न करता पाण्यात उडी घेतली...

या चौघा ट्रॅकमेननं मुंबईहून कल्याणच्या दिशेनं जाणारी लोकल प्लॅटफॉर्म नंबर तीन पासून लोकल काही अंतरावर थांबवली. या चौघांनी ही रेल्वे सावधानता दाखवून थांबवली नसती तर लोकल ट्रेन लाकडाच्या ओंडक्यावरून गेली असती आणि मोठा अपघात झाला असता. मात्र या देवदूतांच्या प्रसंगावधानतेमुळे हजारो प्रवाशांचा जीव वाचला... 

या तरुणांनी पाण्यात उड्या घेत हे लाकडी ओंडके बाजुला काढले आणि रेल्वेला मार्ग मोकळा करून दिला.