नालासोपारा : आज दुसऱ्या दिवशीही नालासोपारा जलमय असलेला पाहायला मिळतोय.
पाणी काढण्यासाठी महापालिका यंत्रणा कार्यान्वित आहे पण पाणी काही ओसरण्याचे नाव घेताना दिसत नाही.
सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाही रस्त्यावर गुडघ्याइतकं पाणी दिसतंय. रस्त्यावरील गणेश मंडळातही पाणी गेलंय. शहरातील मुख्य रस्तेही पाण्याखालीच आहेत.
नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, तुलिंज, टाकीपाडा रस्ता आजही पाण्याखाली आहे.