टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दहावी ते पदवीधरांना नोकरी, 44 हजारपर्यंत मिळेल पगार

TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर  सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी,  वैज्ञानिक सहाय्यक 'क',  परिचारिका 'ए',वैज्ञानिक सहाय्यक 'ब',  सहायक सुरक्षा अधिकारी,  फार्मासिस्ट 'बी', तंत्रज्ञ 'सी',  लघुलेखक, तंत्रज्ञ 'अ', निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी 'अ',  परिचर आणि व्यापार मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Sep 10, 2023, 12:30 PM IST
टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दहावी ते पदवीधरांना नोकरी, 44 हजारपर्यंत मिळेल पगार  title=

TMC Recruitment: खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

टाटा मेमोरियल सेंटर  सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी,  वैज्ञानिक सहाय्यक 'क',  परिचारिका 'ए',वैज्ञानिक सहाय्यक 'ब',  सहायक सुरक्षा अधिकारी,  फार्मासिस्ट 'बी', तंत्रज्ञ 'सी',  लघुलेखक, तंत्रज्ञ 'अ', निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी 'अ',  परिचर आणि व्यापार मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत.

सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पर्सनल मॅनेजमेंटमध्ये पदवी/पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. सहायक लेखाधिकारी पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएट/डिग्री किंवा डिप्लोमा इन फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स केलेला असावा. वैज्ञानिक सहाय्यक क', परिचारिका ‘ए’ पदासाठी उमेदवाराकडेसंबंधित क्षेत्रात बीएससी पूर्ण असावी. 
 
वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’पदासाठी उमेदवारांनी बीएससी/ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डीएमएलटी) मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. सहायक सुरक्षा अधिकारी पदासाठी उमेदवारांकडे सशस्त्र दलांकडून पदवी प्रमाणपत्र असावे. फार्मासिस्ट ‘बी’पदासाठी उमेदवारांनी बीफार्म/डी फार्म पूर्ण असावे. तंत्रज्ञ ‘सी’ पदासाठी उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर इंजिनीअररिंगमध्ये डिप्लोमा किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री पूर्ण केलेली असावी. ज्युनिअर टायपिस्ट पदासाठी उमेदवांनी ग्रॅज्युएट/पदवी किंवा संगणक किंवा आयटीमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. 

Bank Job: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, पदवीधरांनी 'या' पत्त्यावर पाठवा अर्ज

 तंत्रज्ञ ‘अ’ पदासाठी उमेदवारांनी विज्ञान विषयात बारावी केलेली असावी. निम्न विभाग लिपिक पदासाठी उमेदवार पदवीधर असावा. स्वयंपाकी 'अ' परिचर आणि व्यापार मदतनीस पदासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

उमेदवारांकडून 300 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. मागासवर्गीय उमेदवारांना शुल्कात सवलत देण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 18 हजार ते 44 हजार 900 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. 22 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी

एमपीएससी आणि पोलीस भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत बारावी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार ते 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पोस्टिंग दिले जाईल याची नोंद घ्या. 

2 डिसेंबर 2023 उमेदवारांची पूर्व परीक्षा घेतली जाईल. यासाठी छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 11 सप्टेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे. तर 3 ऑक्टोबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.