कोरोनाची तिसरी लाट येणार हे निश्चित; सरकारच्या तयारीचा वेग वाढला

 कोरोना संसर्गामुळे राज्यात बिकट परिस्थिती तयार झाली असताना, आणखी मोठ्या संकटाची धास्ती तज्ज्ञांना लागली आहे. 

Updated: May 1, 2021, 12:40 PM IST
कोरोनाची तिसरी लाट येणार हे निश्चित; सरकारच्या तयारीचा वेग वाढला title=

मुंबई : कोरोना संसर्गामुळे राज्यात बिकट परिस्थिती तयार झाली असताना, आणखी मोठ्या संकटाची धास्ती तज्ज्ञांना लागली आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार हे निश्चित असून १५ जुलैनंतर सप्टेंबरपर्यंत तिस-या लाटेला सामोरं जावं लागेल आणि कदाचित नोव्हेंबर-डिसेंबरला चौथ्या लाटेला तोंड द्यावे लागेल. असे कोरोना टास्क फोर्स समितीचे  अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी म्हटले आहे.

 चौथ्या लाटेनंतर विषाणू क्षीण होतो, लसीकरण झालेले असते आणि हर्ड इम्यूनिटी आलेली असते. त्यामुळं व्हायरसही आयुष्याचा भाग बनलेला असेल, असा यंदाजही डॉ. ओक यांनी व्यक्त केला आहे.
 
 दुसरी लाट स्थिरावली आहे. परंतु ही लाट झपाट्यानं ओसरणार नाही. १५ मेनंतर लाट ओसरू लागेल. आता पॉझिटिव्हीटी रेट कमी होतोय. हे लाट ओसरण्याचे लक्षण असल्याचे डॉ. ओक यांनी म्हटलंय.

तिस-या लाटेची तयारी काय केलीय?

- नविन औषधांचा ऊहापोह केला आहे. ज्या औषधांना सप्रमाण आधार निर्माण झालाय अशी २-३ नविन औषधे टास्क फोर्सने सुचवली आहेत.

- फिल्ड हॉस्पिटल बंद करू नका

- तिस-या लाटेत सिटी स्कॅनला वापरायचे आहे पण एका मर्यादेत

- अल्ट्रा पोर्टेबल एक्सरे मशीनचा वापर अधिक प्रमाणात केला जाईल

- ई आयसीयू ही संकल्पना वापरली जाईल. 

- ३०० बेड असणा-या रूग्णालयांचा स्वत:चा ऑक्सिजन प्लांट असावा

- बेड लागतील, ऑक्सिजन लागेल, ऑक्सिजन कॉन्स्टेंटर  मशीन रूग्णाच्या घरी द्यावी लागतील,आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स लागतील.

- झायडस कॅडिलाचे व्हायराफिन नावाचे ड्रग्ज वापरायचे विशिष्ट परिस्थितीतीत वापरायचे आहे. ऑक्सीजनवर असणारा रुग्ण गंभीर होण्यापूर्वी हे ड्रग्ज दिल्यास अधिक उपयोगी ठरते. यामुळं ऑक्सीजनची गरज कमी होतो व रूग्णाला लवकर घरी पाठवता येते. हे ड्रग टास्क फोर्सने सुचवले आहे.

- ज्यांना कोव्हिड होवून गेलाय, त्यामधील काहींवर दूरगामी परिणाम झालेत. श्वास घेण्यास त्रास होवू लागलेत. त्यामुळं आगामी काळात शहरांमध्ये ठिकठिकाणी ऑक्सिजन घेण्यासाठी ऑक्सिजन कॉन्स्टेंटर बसवावी लागणार आहेत.

- लसीकरण केंद्र आणि कोव्हिड रूग्णालये ही वेगळी असायला हवीत. संसर्ग टाळण्यासाठी रूग्णालयात लसीकरण केंद्रे नकोत.

- जगात सर्वत्रच लशींचा तुटवडा जाणवतोय. पूर्वनोंदणी करून आणि दिलेल्या वेळेतच लसीकरणासाठी जा.

- जेवढे लसीकरण जास्त होईल, तितकी हर्ड इम्यूनिटी वाढेल आणि येणा-या लाटांची तीव्रता कमी होईल.

- ३८ ते ४० वयोगटातील लोकांमध्ये कोरोना गंभीर होतोय व मृत्यूचे प्रमाण वाढलंय

- मोठ्या संख्येने लशीचा किमान पहिला डोस तरी देणे गरजेचे आहे.

-कोव्हिशिल्डचा दुसरा डोस हा दोन महिन्यांनी घेतला तर त्याचा परिणाम अधिक चांगला असल्याचे अभ्यासातून समोर आलंय. कोव्हॅक्सीनच्या बाबतीत हा कालावधी २८ दिवसांचा आहे. पण ही लस कमी प्रमाणात दिली जातंय. ज्यांना एलर्जिक प्रोफाईल आहेत किंवा ह्रदयावरील मोठी औषधे सुरू आहेत त्यांना कोव्हॅक्सीन द्यायला हवी.

- आताचा लॉकडाऊन हा गेल्या वेळच्या तुलनेत मला काही समाधानकारक वाटत नाही. निर्बंध कायम ठेवत लसीकरणाला वेग देणे गरजेचे. १५-२० मेनंतर लसीकरणाला वेग येईल.

- इंग्लंडने जी नियोजनबद्ध पाऊले टाकली, त्यातून आम्ही धडा घेवून टास्क फोर्सने राज्य सरकारला सूचना केल्या आहेत

- आपण खाजगी रूग्णालयांना लस द्यायला हवी, अन्यथा सरकारी लसीकरण केंद्रावर लोंढा वापरावा लागेल.

- इंग्लंडमध्ये १० वर्षांवरील मुलांना लस देण्याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.त्यांचे म्हणणं आहे की आम्ही ऑगस्टनंतर १० वर्षांखालील मुलांनाही आम्ही लस देवू. सर्वांना कव्हर करावे लागेल.