मुंबई : महाराष्ट्राच्या निर्मितीला मोठा संघर्षाचा इतिहास आहे. मराठीजणांच्या रक्ताने आणि घामाने हे राज्य उभे राहिले आहे. 106 हुताम्यांच्या त्यागानंतर राज्य स्थापन झाले. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उपस्थित होते.
तसेच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवरही उपस्थित होते.
ध्वजारोहण समारोहानंतर मान्यवरांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पूष्प अर्पण करुन अभिवादन केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/i9MtT6ET35
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2021