कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानातील (राणीच्या बागेतील) पेंग्वीन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी असा घणाघाती आरोप मुंबई कॉंग्रेसने केला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंची संकल्पना असलेल्या पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावर कॉंग्रेसने निशाणा साधला आहे. राणी बागेतील ३ वर्षांच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी 15 कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे.
भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन पुन्हा एकादा वादाचा आणि चर्चेचा मुद्दा ठरत आहे. नुकतेच महापालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी 15 कोटींचे टेंडर काढले आहे. या खर्चावर कॉंग्रेसने सवाल उपस्थित केला आहे. यापूर्वी गेल्या ३ वर्षांसाठी पेंग्विनच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला 11 कोटी देण्यात आले आहेत.
पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय? असा सवाल BMCचे विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी केला आहे.
भायखळा राणी बागेतील पेंग्विनच्या देखभाली पालिकेची सुधारीत निविदा काय आहे?
राणीबागेतल्या पेंग्विन्सच्या आलिशान लाईफस्टाईल खर्च कसा आहे
पेंग्विन खरेदीसाठी आणि कक्षासाठी एकूण २५ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर ३ वर्षाच्या देखभालीसाठी 11 कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी 15 कोटी खर्च अपेक्षित आहे..
निविदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल.
2017 दक्षिण कोरियातून आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनसाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे.
पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्किय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत.
दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य,विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लीमेंटस् दिल्या जातात...
गेल्या तीन वर्षात एक नवजात पिल्लु पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यु झाला आहे...
भायखळा राणी बागेतील पेंग्विनच्या देखभाली पालिकेची सुधारीत निविदा काय आहे??