बँकेचे सर्व्हर हॅक! तब्बल साडेपाच कोटींची चोरी; मुंबई पोलिसांच्या रडारवर हॅकर्स

 बँकेचे सर्व्हर हॅक करून साडेपाच कोटी रुपये काढणाऱ्या गॅंगच्या तिघांना ग्वालियरमध्ये अटक करण्यात आली आहे

Updated: Sep 5, 2021, 10:18 AM IST
बँकेचे सर्व्हर हॅक! तब्बल साडेपाच कोटींची चोरी; मुंबई पोलिसांच्या रडारवर हॅकर्स title=

मुंबई : बँकेचे सर्व्हर हॅक करून साडेपाच कोटी रुपये काढणाऱ्या गॅंगच्या तिघांना ग्वालियरमध्ये अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिक्षक आणि त्याचे विद्यार्थी आहे. या गॅंगचा मास्टरमाइंड नायजेरिअन आहे. तो नायजेरियात बसून भारतात हॅकिंगचे कट रचत असतो. नुकतेच मुंबई पोलिसांना तिघांना ट्रांझिट रिमांडसाठी आपल्या ताब्यात घेतले आहे.

हॅंकिंग गॅंगने 14 ते 16 ऑगस्टदरम्यान, बॅंक ऑफ बहरीन ऍंड कुवेतच्या मुंबई शाखेचे सर्व्हर हॅक करून 5.50 रुपये काढले. मग या लोकांना या पैशाला देशातील विविध 87 खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. पोलिसांनी तपास केल्यानंतर माहिती समोर आली की, हॅकर्सची ही गॅंग नायजेरिअन मास्टरमाइंड चालवतो. मार्टिन काही काळ भारतात राहिला आहे. मार्टिनच्या इशाऱ्याने हॅकर्स गॅंगने बॅक ऑफ बहरिन ऍंड कुवेतला लक्ष केले.

मुंबई क्राइम ब्रॅंचच्या तपासात माहिती मिळाली की, ज्या 87 खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले आहे. त्यापैकी तीन खाते ग्वालियरमधील आहेत. या तिन्ही खात्यांमधून पैसे काढण्यात आले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांची टीम ग्वालियरला पोहचली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने, तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 

मुंबई पोलिसांनी दिल्लीतूनही समीर नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. तपासात माहिती मिळाली आहे की, इंटनेट बँकिंगच्या माध्यमातून ही चोरी करण्यात आली आहे. आणि त्याला एका चोरीतून 10 ते 25 लाख रुपये मिळत असत.