मुंबईत 10 घरं आणि फॉर्चुनर कार! फेरीवाला असा बनला 10 कोटींचा मालक

एकेकाळचा साधा फेरीवाला करोडपती कसा झाला? त्याची ही मालमत्ता बघून सामन्यांचे डोळे पांढरे होतील

Updated: Aug 13, 2021, 09:54 PM IST
मुंबईत 10 घरं आणि फॉर्चुनर कार! फेरीवाला असा बनला 10 कोटींचा मालक title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : काही वर्षांपूर्वी गळ्यात ब्लेडची पाकिटं लटकवून मुंबईतल्या लोकलमध्ये फिरणारा एक फेरीवाला चक्का 10 कोटींचा मालक बनला आहे. 2005 साली हा फेरीवाला अंगावर ब्लेडची पाकिटं बांधून लोकलमध्ये फिरायचा, मात्र  15 वर्षांमध्ये त्यानं अशी काही माया जमवली, की भल्या भल्यांचे डोळे पांढरे होतील. 

या फेरीवाल्याचं नाव आहे संतोष कुमार सिंह उर्फ बबलू. एकेकाळचा हा साधा फेरीवाला करोडपती कसा झाला? त्याची ही मालमत्ता बघून सर्वांनाच प्रश्न पडला की संतोष कुमारने ही मालत्ता जमवली कशी. ब्लेड विकतानाच संतोषने एक टोळी तयार केली. सीएसएमटी ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यानं आपल्या टोळीच्या माध्यमातून रॅकेट चालंवलं. ही टोळी स्टेशन आणि गाड्यांमधल्या फेरिवाल्यांकडून खंडणी उकळत असे.

500 रुपयांपासून ते 5 हजारांपर्यंत खंडणी घेतली जात असे. पैसे दिले नाहीत, तर संतोष आणि त्याचे गुंड मारहाण करायचे. या खंडणीखोरीतून त्यानं तब्बल 10 कोटींची मालमत्ता जमवली. पोलिसांनी संतोषसह त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्याची बेनामी मालमत्ताही जप्त केली आहे. यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपली बायको शिकवण्या करते, आपला गारमेंटचा व्यवसाय आहे अशी बतावणी संतोष करत होता.

पण यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे 15 वर्षांत 10 कोटींची संपत्ती जमा करेपर्यंत पोलीस आणि संबंधित यंत्रणा झोपल्या होत्या का, असा प्रश्न विचारला जात आह. आता मुंबईत असे आणखी किती स्लमडॉग गैरमार्गानं मिलेनियर झालेत, हे शोधणं पोलिसांसमोर खरं आव्हान आहे.