मुंबईत NCBच्या पथकावर नायजेरियन ड्रग तस्करांचा हल्ला, पाच अधिकारी जखमी

हल्ल्यात एका अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे

Updated: Aug 13, 2021, 08:42 PM IST
मुंबईत NCBच्या पथकावर नायजेरियन ड्रग तस्करांचा हल्ला, पाच अधिकारी जखमी title=

मुंबई : मुंबईतल्या मानखुर्दमध्ये एनसीबीच्या ( Narcotics Control Bureau) पथकावर ड्रग्ज पेडलर्सनं (Drug Peddler)सशस्त्र हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एनसीबीचे (NCB) पाच अधिकारी जखमी झाले असून एका अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलं असून पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मानखुर्द (Mankhurd Station) आणि वाशी स्टेशन (Vashi Station) दरम्यान रेल्वे रुळालगत खाडी परिसरात नायजेरियन नागरिकांचा अंमली पदार्थांचा धंदा सुरू होता. याची माहिती मिळाल्यानंतर  तस्करी करणाऱ्यांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पथकासह छापा घातला. मात्र ड्रग्ज पेडलर्सनी या पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात एनसीबीचे पाच अधिकारी जखमी झाले. 

दरम्यान, या कारवाईत एक कोटी रुपयाचं कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आलं आहे. कारवाईदरम्यान काही आरोपी फरार झाले तर मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. 

गेल्या आठवडाभरात एनसीबी पथकावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे.