चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने अटक

गोरेगावमधील सोनसाखळी चोरी प्रकरणातील आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने मालाड येथील बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. 

Updated: Jul 6, 2017, 08:09 AM IST
चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने अटक title=

मुंबई : गोरेगावमधील सोनसाखळी चोरी प्रकरणातील आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने मालाड येथील बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. 

बांगुरनगर पोलीस अणि गुन्हे प्रगटीकरण पथकाने या आरोपीला तामिळनाडू राज्यातून सापळा रचून अटक केली. २७ जून रोजी गोरेगाव पश्चिम येथे राहणारे  जसपाल किशन सिंग यांच्यावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या छातीवर हात मारून जसपाल यांच्या गळ्यातील तीन चैनी, दोन लॉकेट घेवून पलायन केले होते. 

आरोपीला सापळा रचून अटक केल्यावर त्याच्याकडून तीन सोनसाखळ्या, दोन लॉकेट, असे सात लाख किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. या आरोपीविरोधात यापूर्वी बांगुरनगर आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात मारामारी आणि महिलांच्या छेड़छाडीच्या दोन गुन्हाची नोंद आहे.