सुशांत आत्महत्या प्रकरणात या 6 जणांविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल

सीबीआयचा तपास या 6 आरोपींच्या भोवती फिरणार

Updated: Aug 7, 2020, 08:47 AM IST
सुशांत आत्महत्या प्रकरणात या 6 जणांविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने 6 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने आयपीसीच्या कलम 306, 341, 342, 420, 406 आणि 506 अन्वये एफआयआर नोंदविला आहे. हे स्पष्ट आहे की येत्या काही दिवसांत सीबीआयचा तपास या आरोपींच्या भोवती फिरणार आहे.

'मेरे पिता की मारुती' पासून अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणारी रिया चक्रवर्ती सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड होती. तिच्यावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणे, पैशांचा गैरफायदा, गुन्हेगारी कट करण्याचा आरोप आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियाविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यांनी रियावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय ईडीने रिया चक्रवर्तीला समन्स बजावले आहे.

शोविक चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा भाऊ आहे. सुशांतबरोबर तो तीन कंपन्यांचा संचालकही आहे. शोविक चक्रवर्ती सुशांतच्या घरी ब-याचदा यायचा. त्याचे आणि सुशांतची अनेक एकत्र फोटोही आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर शोविकने एक पोस्ट लिहिले. ज्यामध्ये त्याने सुशांतकडून काय शिकलो हे सांगितले होते. त्यांनी लिहिले हो की, 'तुझ्यावरील प्रेम माझ्या मनात कायम राहील.'

सीबीआयच्या एफआयआरमध्ये सुशांत सिंह राजपूतचा गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांचेही नाव आहे. सॅम्युअल मिरांडावरही अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी झाली. सुशांतच्या कुटुंबाचा आरोप आहे की रिया चक्रवर्तीने गेल्या वर्षी सुशांतचा मॅनेजर म्हणून सॅम्युअल मिरांडा यांची नियुक्ती केली होती. एकेकाळी तो सुशांतच्या जवळच्या लोकांमध्ये होता.

घरातून सुशांतचा मृतदेह सापडला त्या वेळी सॅम्युअल मिरांडा, कुक केशव आणि नीरज यांच्याशिवाय सिद्धार्थ पिठानी उपस्थित होते. सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ आणि कुक अशी माणसे आहेत ज्यांनी प्रथम सुशांतला मृत पाहिले.