मुंबई : आजच्या रात्री आकाशात सूपरमून दिसणार असल्याचं खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलंय.
पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला सुपरमून म्हटलं जातं. चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ८४ हजार कि.मी अंतरावर असतो. मात्र या दिवशी चंद्र ३ लक्ष ५७ हजार किमी अंतरावर असणार आहे.
सूपरमुन योगाच्यावेळी पौर्णिमेचं चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के मोठं आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसणार आहे.
आज दत्तजयंती आहे. यादिवशी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी पूर्वेला चंद्र रोहिणी नक्षत्रात उगवेल आणि रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्ण होईल.