एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापला जाणार आहे. त्यापैकी या महिन्यातील चार दिवसाचा पगार कापला जाणार

Updated: Oct 30, 2017, 07:07 PM IST
एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार title=

मुंबई : एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापला जाणार आहे. त्यापैकी या महिन्यातील चार दिवसाचा पगार कापला जाणार

उरलेल्या 32 दिवसांचा पगार पुढील सहा महिन्यात कापणार. चार दिवस संप त्याच सोबत नुकसान भरपाई म्हणून नियमानुसार एका दिवसास आठ दिवस या नुसार ३६ दिवसाचा पगार कापला जाणार.

ऐन दिवाळी सणादरम्यान राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी चार दिवस संप पुकारला होता. यामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळी सणानिमित्त एसटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. याच दरम्यान कर्मचाऱ्यांनी संप केल्याने प्रवाशांना ठिकठिकाणी खोळंबा झाला. 

भाऊबीजेच्या दिवशी अखेर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. या संपादरम्यान एसटीचेही लाखोंचे नुकसान झाले.