SSR Case : सीबीआय लवकरात लवकर चौकशी करेल - देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने आत्मचिंतन करावे असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.   

Updated: Aug 19, 2020, 01:34 PM IST
SSR Case : सीबीआय लवकरात लवकर चौकशी करेल - देवेंद्र फडणवीस title=

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरी देखील त्याच्या आत्महत्येमागील ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. अखेर बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुनावला आहे. तर आता या प्रकरणावर विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने आत्मचिंतन करावे असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास दृढ होईल. शिवाय महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांत आत्महत्या प्रकरणाची जबाबदारी सीबीआयकडे दिल्यामुळे लवकरात लवकर तपास लागेल.' असा विश्वास विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

त्याचप्रमाणे सर्वोच्च  न्यायालयानं सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या चाहत्यांना योग्य तो न्याय मिळेल असं देखील ते म्हणाले आहेत. #SushantSinghRajput प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुनावताना  महाराष्ट्र राज्य शासन आणि मुंबई पोलिसांनी या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे  आणि सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.