SSR Case: 'पब एँड पार्टी गँग' गजाआड जाणार- आशिष शेलार

पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही! 

Updated: Aug 19, 2020, 01:06 PM IST
SSR Case: 'पब एँड पार्टी गँग' गजाआड जाणार- आशिष शेलार   title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Sushant Singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला. बुधवारी या बहुप्रतिक्षित प्रकरणाचा सर्व तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ज्यानंतर विरोधी पक्षानं महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळालं. 

भाजप नेते आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय़ानंतर लगेचच ट्विट करत, 'आता न्याय होईल... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू असताना त्या काळात १५ हजारहून अधिक मुंबईकरांचा मृत्यू होत असताना धमाल करणाऱ्या पब एँड पार्टी गँगची गजाआड जाण्याची वेळ आली आहे', असा सूर आळवला. 

पोलिसांच्या दिशाभूल करणाऱ्या तपासामागे दडलेले हात आता सर्वांसमोर येतील असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केलं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला इतके दिवस उलटूनही मुंबई पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही, बिहार पोलिसांना मदत का केली गेली नाही असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. शिवाय यापुढं सीबीआय तपासात राज्य सरकारनं हस्तक्षेप करु नये अथवा जनक्षोभाला सामोरं जावं लागेल आशिष शेलार यांची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

 

शेलार यांनी ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलं? 

"पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही! 'सिंघम' चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक, ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही? कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात, पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला.याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?'', असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित करत राज्य सराकारला खडे बोल सुनावले.